4 जानेवारी 2022 पासून नव्या किमती लागू होण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हिरो मोटोकॉर्पने नवीन वर्षात आपल्या दुचाकीच्या किमती वाढविणार असल्याची घोषणा केली आहे. कंपनी 4 जानेवारी 2022 पासून दुचाकीच्या किमतीत 2000 रुपयाची वाढ करणार आहे. नवीन किमती दुचाकीसाठी एक्स शोरुमवर वाढविण्यात आल्या आहेत, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
साधारणपणे कोणत्या मॉडेलवर किती रुपयांची वाढ करण्यात आली आहे याची माहिती कंपनीने यावेळी दिलेली नाही. यामध्ये जर आपण हिरोची दुचाकी खरेदी करण्याचा प्लॅन करणार असाल तर तो चार जानेवारीच्या अगोदर करावा लागणार आहे.
6 महिन्यात 8 हजाराने महागली हिरोची दुचाकी
हिरो मोटो कॉर्पने मागील सहा महिन्यात तिसऱयांदा दुचाकीच्या किमती वाढविल्या आहेत. यामध्ये 1 जुलैला दुचाकीच्या किमती एक्स शोरुम किमत 3,000 रुपयानी वाढविल्या. त्यानंतर 20 सप्टेंबर रोजी पुन्हा 3,000 रुपयांनी किमतीत वाढ केली. तेव्हाही कंपनीने कच्च्या मालाच्या किमती वाढल्याचे कारण दिले होते. तेच कारण सध्याही किंमती वाढवण्यामागे दिले जात आहे.