रस्त्यावरील अनेक गाडय़ांवर वडापाव, समोसे, भजीसारख्या तेलकट व मसालेदार खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. उघडय़ावर विकल्या जाणाऱया या पदार्थांमुळे अनेक आजार उद्भवतात.
विपेत्यांकडून हे मसालेदार पदार्थ वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून खायला दिले जातात. त्यामुळे वर्तमानपत्राच्या कागदावरील शाई खाद्यपदार्थांना चिकटते. असे पदार्थ पोटात गेल्यास हानिकारक ठरतात. तसेच पचनक्रियेवरही त्याचे विपरीत परिणाम होतात. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) तेलकट खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून विकण्यास बंदी घातली आहे.

खाद्यपदार्थ व्यावसायिक आणि नागरिक वर्तमानपत्राच्या कागदातून अन्नपदार्थांची विक्री अथवा खरेदी करू नका, त्यामुळे आरोग्यास अपाय होऊ शकतो. मात्र त्यानंतरही काही विपेत्यांकडून वर्तमानपत्राच्या कागदात खाद्यपदार्थ गुंडाळून विकले जात असल्याचे दिसून येत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. रस्त्यावर विपेत्यांकडून खाद्यपदार्थ घेताना विपेता वृत्तपत्रातून आपल्याला पदार्थ देत असतो. मात्र हे पदार्थ आपल्या जीवावर बेतू शकतात.
रस्त्यावरील विपेत्यांकडून सर्रासपणे वृत्तपत्राचा वापर होत असतो. त्याशिवाय घरात तेलात केलेले फराळ, खाद्यपदार्थ केल्यानंतर पदार्थातील तेल शोषण्यासाठी वृत्तपत्रात काढले जातात. पदार्थ बनवताना आरोग्याच्या दृष्टीने कितीही काळजी घेतली तरी हे वृत्तपत्रामुळे हे पदार्थ आरोग्यास हानीकारक ठरू शकतात.
वृत्तपत्रांमध्ये बांधलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे कर्करोगाशी निगडित समस्या निर्माण होऊ शकतात. याचा त्रास ज्ये÷ नागरिक, लहान मुले आणि आधीच आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांना अधिक होणार असल्याचेही ’एफएसएसएआय’ने आपल्या अहवालात म्हटले आहे.