प्रतिनिधी / हुपरी
हुपरी शहरात प्राचीन काळातील श्री.१००८ चंद्रप्रभुजैन मंदीराच्या जीर्णोद्धाराचे काम दीड महिना झाले चालू आहे. सोमवार ६ जुलै रोजी सकाळी मंदिराच्या तिसऱ्या टप्प्याच्या गर्भ गृहाच्या पुढे असणाऱ्या कलश मंडपात जीर्णोद्धारासाठी खुदाई करत असताना ३ ते ४ फुटावर २३ वे तीर्थंकर श्री पार्श्वनाथ भगवंताच्या प्राचीन काळातील दोन प्रतिमा आढळून आल्या. या प्रतिमा जाणकारांच्या सांगण्यावरून अंदाजे इ. स. पुर्व १२०० मधील असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान या प्रतिमा ९०० वर्षांपूर्वीच्या असाव्यात असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. एका प्रतिमेच्या पायथ्याशी हायर मोडी कन्नड भाषेत मजकूर लिहिण्यात आला असल्याचे संजयजी गोपलकार यांनी सांगितले. या प्रतिमेना अभिषेक घालून विधिवत पुजा करण्यात आली. त्या ठिकाणी दर्शनासाठी श्रावक, श्राविका व भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी होत आहे.
हुपरी येथील प्राचीन काळातील मंदिर पाडून तेथे नवीन जीन मंदिर बांधण्याची योजना ट्रस्टीने आखून त्यानिमित्ताने जे. सी. बी. मशीनने उत्खनाचे काम सुरू केले आहे. खुदाईच्या वेळी अचानक पालथ्या पडलेल्या शिलालेख दगडाच्या प्रतिमा पंडित सुनील सुरेश उपाध्ये व संतोष उपाध्ये यांना दिसल्या त्या सुरक्षित पणे बाहेर काढण्यात आल्या त्या सुलट्या केल्या असता १००८ श्री पार्श्वनाथ भगवंताच्या अती पुरातन काळातील असल्याचे दिसून आले. या प्रतिमेखाली कन्नड भाषेत काही मजकूर लिहिलेला असून त्याची जाणकारांकडून माहिती घेण्याचे काम येथील ट्रस्टी करत गोपलकर यांनी सांगितले.
हुपरी चंदेरी नगरीत पुरातन काळातील ९०० वर्षांपूर्वीची भगवंताची प्रतिमा सापडलेचे समजताच दर्शन घेण्यासाठी प्रतिमा सापडलेचे समजताच दर्शन घेण्यासाठी अध्यक्ष सुदर्शन भोजे, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नानासाहेब गाट,शितल पाटील, महावीर गाट,अजित पाटील, अनिल पाटील, बाहुबली गाट,अशोक बल्लोळे यांच्यासह शहरातील जैन बांधव ,श्रावक, श्राविका अनेक भाविकांनी गर्दी केली असून भविष्यात या प्रतिमेचा वज्रलेप करून तो भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचे ट्रस्टीच्या वतीने संजयजी गोपलकर यांनी सांगितले.
Trending
- विशाळगडावर सोमवारपासून शिवराज्याभिषेक सोहळा,मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठानतर्फे आयोजन
- ‘महसूल’च्या बदल्यांचा सावळा गोंधळ
- माउंट एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचा ‘ब्रेन डेड’
- मोफत सीड बॉल्सच्या वाटपाने वृक्षारोपण केले सोपे…!
- किल्ले विशाळगडावर मांस शिजवण्यास, अमली पदार्थांचा व्यवसाय करण्यास बंदी ; पुरातत्त्व विभागाचा आदेश
- शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे समुपदेशनात उघड
- धक्कादायक! मिरजेत अल्पवयीन मुलीचा गळा चिरला,गांजाच्या नशेत तरुणाच कृत्य
- महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा