सध्या आघाडीचा अभिनेता म्हणून हृतिक रोशनची ओळख असली तरी लहान असताना तो तोतरे बोलत असल्याने त्याला नेहमी दुय्यम दर्जाची वागणूक मिळाली. यावर हृतिकने मोठय़ा जिद्दीने यशस्वीरित्या मात केली. हृतिकची ही प्रेरणादायी कहाणी इयत्ता सहावीच्या पुस्तकातही वाचायला मिळते. ‘आत्मविश्वास’ या धडय़ात याचा समावेश करण्यात आला आहे. एका ट्विटर युजरने हा धडा शेअर केला. हृतिक रोशननेही अनेक मुलाखतींमध्ये, कार्यक्रमांमध्ये याबद्दल सांगितले आहे. लहान असताना तोतरे बोलण्याची सवय असल्याने हृतिकला नेहमी चिडवले जायचे. त्याला अपमानास्पद वागणूक मिळायची. पण, त्याने अतिशय जिद्दीने यावर मात केली. एका मुलाखतीमध्ये हृतिकने सांगितले की, मी दररोज स्पीच थेरपी करायचो. अजूनही मी दिवसातून कमीत कमी एक तास माझ्या उच्चारांचा अभ्यास करतो. केवळ लहानपणीच नव्हे तर 2012 पर्यंत म्हणजेच मी अभिनेता झाल्यानंतरही थोडय़ाफार प्रमाणात मला त्रास जाणवायचा असे हृतिकने सांगितले.
Related Posts
Add A Comment