अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 26 सप्टेंबर 2021 स. 10.45
● पुन्हा निच्चांकी बाधित वाढीची नोंद
● शनिवारी रात्री अहवालात 141 बाधित
● एकूण 6,770 जणांची तपासणी
● पॉझिटिव्हिटी दर 2.08 टक्के
● जिल्ह्यात लसीकरण गतीने सुरू
● लसीकरण 24 लाखांच्या पार
सातारा / प्रतिनिधी :
गेल्या काही दिवसापासून येणारा रविवार हा दिलासा घेऊन येत असून, या रविवारी देखील 141 एवढ्या नीचांकी बाधित वाढीची झालेली नोंद मोठा दिलासा देणारी ठरलेली आहे. सध्या जिल्ह्यात लसीकरणाने चांगली गती घेतली असून लसीकरणाने चोवीस लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मंदावत चाललेली बाधित वाढ, वाढलेला लसीकरणाचा टक्का, घटलेला मृत्यू दराचा टक्का आणि निचांकी बाधित वाढ या सर्व गोष्टी सप्टेंबर अखेरीस जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात येत असल्याचा संदेश देत आहेत.
शनिवारी अहवालात 141 बाधित
रविवारी सकाळी देण्यात आलेल्या शनिवारी रात्रीच्या अहवालात पुन्हा नीचांकी बाधित वाढीची नोंद झाली असून, फक्त 141 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामध्ये एकूण 6 हजार 770 जणांची तपासणी करण्यात आलेली होती. यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 20 8 टक्के एवढा खाली बसलेला आहे.
जिल्ह्यात लसीकरण 24 लाखांच्या पार
कोविन पोर्टलवर असलेल्या नोंदीनुसार आज सकाळी 118 जणांचे लसीकरण झालेले असून आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 24 लाख 36 हजार 449 एवढ्या मोठ्या प्रमाणावर दिलासादायक लसीकरण झालेले असून यामध्ये पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 17 लाख 44 हजार 743 एवढी असून दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या सहा लाख 91 हजार 756 एवढी झालेली आहे.
हॉटस्पॉट तालुक्यांसह जिल्हा सावरला
गत तीन-चार महिन्यांपासून सातारा फलटण, कराड, खटाव, माण, कोरेगाव, खंडाळा हे तालुके हॉट स्पॉट ठरले होते. मात्र ऑगस्टनंतर बाधित वाढ मंदावत गेली आणि यामध्ये फक्त सातारा, फलटण, खटाव तालुके सातत्याने चिंताजनक ठरत होते. मात्र सप्टेंबरमध्ये सातारा, फलटण, खटाव, कराड सह सगळ्याच तालुक्यात वाढ मंदावत गेली असून यामुळे सातारा जिल्हा सावरू लागला आहे. त्यात लवकरच आता धार्मिक स्थळे खुली होत असून शाळा सुरू होत असल्याने जगरहाटीला गती येणार असून यामध्ये सर्वांनीच स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यावी असे शासनाचे मत आहे त्या नुसारच यापुढील वाटचाल सुरू राहणार आहे.
शनिवारी जिल्ह्यात
बाधित 178
मुक्त 122
मृत्यू 00
शनिवारपर्यंत जिल्ह्यात
एकूण नमूने 20,42,799
एकूण बाधित 2,47,510
एकूण कोरोना मुक्त 2,38,023
मृत्यू 6,081
उपचारार्थ रुग्ण 5,845