डोकेदुखीची समस्या अन् गंधशक्ती हरवली
लिझी मॅकगायर स्टार हिलरी डफला कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटची लागण झाली आहे. 33 वर्षीय अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर याची माहिती दिली. अलिकडेच तिने नवे सिटकॉम ‘हाउ आय मेट योर फादर’चे शूटिंग सुरू केले होते.
तीव्र डोकेदुखी, चव अन् गंधशक्ती हरवली आहे. सायनस प्रेशर तसेच बेन फॉगची जाणीव होतेय. माझे लसीकरण झाले होते. तरीही कोरोनाची लागण झाल्याचे तिने सांगितले आहे.
हिलरीला लिझी मॅकगायर या विनोदी सीरिजमधील भूमिकेसाठी ओळखले जाते. याचबरोबर ती ‘एजंट कोडी बँक्स, चीपर बाय द डझन, ए सिंड्रेला स्टोरी, मटेरियल गर्ल्स आणि द परफेक्ट मॅन अँड चीपर बाय द डझन 2 यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसून आली आहे.
हिलरीने 2019 मध्ये प्रियकर मॅथ्यू कोमासोबत लॉस एंजिलिसमध्ये विवाह केला होता. ऑक्टोबर 2018 मध्ये हिलरीला पुत्ररत्न प्राप्त झाले होते. तर चालू वर्षातील मार्च महिन्यात हिलरीने दुसऱया अपत्याला जन्म दिला आहे.