मुंबई
या महिन्यात दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर होंडा मोटारसायकलने आपल्या दुचाकींवर रोख सवलत जाहीर केली असून त्याचा लाभ उठवता येणार आहे. 3 हजार 500 रुपयांपर्यंतच्या सवलतीचा लाभ दुचाकी खरेदीवर मिळवता येणार आहे. होंडा ऍक्टिव्हा, ग्रेझीया, शाईन एक्स-ब्लेड, युनिकॉर्न या दुचाकीवर सवलतीचा लाभ मिळणार आहे. एसबीआय पेडिट कार्डमार्फतच ही सवलत मिळवता येणार असून, योजनेचा फायदा उठवण्यासाठी कार्डमार्फत कमीत कमी 40 हजार रुपये भरावे लागणार असल्याची अट कंपनीने घातली आहे.