मुंबई प्रतिनिधी :
रविवारी चेन्नईतील एचडीएफसी बँकेच्या 100 ग्राहकांच्या खात्यात कोट्यवधी रुपये अचानक जमा झाले. मिळालेल्या माहितीनुसार,100 खातेदारांपैकी प्रत्येकाच्या खात्यात 13 कोटी रुपये जमा झाले आहेत .म्हणजे 100 लोकांच्या खात्यात अचानक 1300 कोटी रुपये आले.
मात्र, अचानक करोडपती झालेल्या या लोकांचा आनंद फार काळ टिकला नाही. या संदर्भात बँकेने सांगितले की तांत्रिक बिघाडामुळे चेन्नईतील काही एचडीएफसी बँकेच्या शाखांमधील काही खात्यांमध्ये अचानक पैसे आले.
पण या सर्व प्रकारामुळे संबंधित खातेदारांना व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली. संध्याकाळपर्यंत ही समस्या सोडवण्यात आली आणि सर्व खात्यांना व्यवहार करण्याची परवानगी देण्यात आली.