ओटवणे/प्रतिनिधी-
विलवडे येथील राजा शिवाजीविद्यालयाचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. या परीक्षेला बसलेले सर्व ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेतून प्रथम क्रमांकवैष्णवी भानुदास कांबळे ९०.४०% द्वितीय- (संयुक्त) यशश्री जयानंद दळवी- ९०% दिक्षा कालिदास दळवी- ९०% तृतीय क्रमांक- पुर्वा भगवान गवस ८९.८०%. यशस्वी विद्यार्थ्यांचे विलवडे ग्रामोन्नती मंडळ (मुंबई) अध्यक्ष संभाजी दळवी सचिव सूर्यकांत दळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रफुल्ल सावंत मुख्याध्यापक एन एल सावंत व शिक्षक कर्मचाऱ्यांनी यांनी अभिनंदन केले आहे.