कणबर्गी येथील शेतकऱयांचा इशारा
प्रतिनिधी/ बेळगाव
कणबर्गी येथील शेतकऱयांच्या जमीनी बुडाने 61 क्रमांक योजना राबविण्यासाठी घेतल्या. घेताना रकमेबरोबरच एक प्लॉट देण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र अनेक वर्षे उलटली तरी अद्याप संबंधितांना जागा देण्यात आली नाही. त्यामुळे 11 जानेवारी रोजी बुडा कार्यालयाला कुलुप घालून त्या ठिकाणी आंदोलन करणार असल्याचा इशारा कणबर्गी येथील शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे दिला आहे.
कणबर्गी येथील अनेक शेतकऱयांच्या जमीनी या योजनेसाठी घेण्यात आल्या आहेत. काही जणांना रक्कम दिली आहे तर काही जणांना अजूनही काही रक्कम देणे बाकी आहे. जागा घेताना शेतकऱयांना एक प्लॉट देवू असे आश्वासन त्यावेळी दिले होते. मात्र अजूनही कोणालाच जागा देण्यात आली नाही. त्यामुळेच आम्ही आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
महसुल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बाळगोंडा पाटील, अजित पाटील, मनोहर मालाई, महेश मालाई, बी. टी. मुचंडीकर, एस. पी. शिग्गीहळ्ळी, लक्ष्मण मुचंडीकर, महेश शिगीहळ्ळी, बी. एम. पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.