12th Result In Maharashtra 2023 : महाराष्ट्रात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला .यामध्ये महाराष्ट्रात बारावीचा यंदा निकाल 91.25 टक्के लागला. यंदाही कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 96.01 टक्के तर सर्वात कमी निकाल मुंबईचा लागला असल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना शरद गोसावी म्हणाले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल घटला आहे.यंदाच्या परीक्षेत अधिकचा वेळ देण्यात आला नव्हता. मार्च 2022 चा निकाल 94.22 टक्के निकाल होता. तर यंदाचा निकाल 2.97 टक्यांनी घटला आहे. दुसरीकडे दिव्यांग श्रेणीत 93 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. बारावीत यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल 4.69 टक्यांनी अधिक लागला. हा निकाल आज दुपारी 2 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.
बारावीच्या परीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल ९३.२८ टक्के
कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचा ९३.२८ टक्के निकाल जाहीर झाला आहे.यंदा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली.कोल्हापूर केंद्रातील तिन्ही जिल्ह्यातील २ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.सीबीएसई,आयसीएसईचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते. विद्यार्थी, पालकांची आता प्रतिक्षा संपली असून, बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन निकाल उपलब्ध आहे.
Related Posts
Add A Comment