फाडा संघटनेची माहिती ः सर्व प्रकारातील वाहनांना मागणी
वृत्तसंस्था/ दिल्ली
जानेवारीत वाहन विक्रीत 14 टक्के इतकी वाढ झाली असल्याची माहिती फाडा या संघटनेने दिली आहे. उत्सवी काळासोबत ग्रामीण भागातील वाढलेल्या मागणीमुळे वाहन विक्री जानेवारीमध्ये अधिक झाली असल्याचे सांगितले जात आहे.
दुचाकी, तीनचाकी, प्रवासी वाहने, ट्रक्टर आणि व्यावसायिक वाहनांची विक्री अनुक्रमे 10 टक्के, 59 टक्के, 22 टक्के, 8 टक्के आणि 16 टक्के इतकी झाली आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन (फाडा)यांनी दिली आहे.

सर्व वाहनांमध्ये पॅसेंजर वाहनांना मागणी जानेवारीमध्ये सर्वाधिक राहिली आहे. शेतकऱयांना त्यांच्या पिकाला योग्य तो भाव मिळाल्याने त्याच्याकडून ट्रक्टरची मागणी बऱयापैकी नोंदवली गेली आहे. तीन चाकी वाहनांची मागणी वर्षाच्या आधारावर पाहता 60 टक्के जास्त राहिली आहे. 2021 च्या तुलनेमध्ये जानेवारी 2022 मध्ये तीनचाकी वाहनांची मागणी 101 टक्के अधिक राहिली आहे.
वेटिंग कालावधी घटला
स्पोर्ट्स युटिलीटी व्हेईकल (सुव्ह) आणि लक्झरी वाहनांची खरेदीसाठी ऑर्डर नोंदवल्यानंतर ते वाहन मिळण्यासाठीचा कालावधी (वेटिंग परेड)कमी होऊन दोन ते तीन महिन्यांवर आला आहे. हा कालावधी घटल्याने ग्राहक वाहन खरेदीसाठी पुढे येत आहेत.
मारुती सुझुकी अग्रस्थानावर
मारुती सुझुकीने वाहन विक्रीमध्ये जानेवारी महिन्यात आघाडीचे स्थान राखले आहे. याच्या पाठोपाठ हय़ुंडाई मोटार, टाटा मोटर्स हे अनुक्रमे दुसऱया आणि तिसऱया क्रमांकावर राहिले आहेत.