बेळगाव ; आनंद क्रिकेट अकादमी आयोजित एसीए चषक 14 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत युनियन जिमखाना संघाने सीसीआय संघाचा पाच गडय़ानी तर काल खेळविण्यात आलेल्या सामन्यात युनियन जिमखान्याने आनंद अकादमीचा 15 धावानी पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळविले. ओंकार चौगुले व साईराज साळुंके सामनावीर ठरले.
सीसीआय संघाने 32.2 षटकात सर्वबाद 136 धावा केल्या. शुभम खोतने 47, झोया काजीने 12, अमर नायक व आनंद जाधव यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे ओंकार चौगुलेने 24 धावात 3, स्वरूप साळुंकेने 29 धावात 2, जुनेद माडिवालेने 22 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल जिमखाना संघाने 24.3 षटकात 5 बाद 137 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला. साईराज साळुंकेने 36, ओंकार चौगुलेने 38, स्वरूप साळुंकेने 22, सुमीत भोसलेने 12 धावा केल्या. सीसीआयतर्फे शुभम खोतने 3, कलश बेन्नीकट्टीने 2 गडी बाद केले.
रविवारच्या सामन्यात युनियन जिमखानाने 39.5 षटकात सर्वबाद 213 धावा केल्या. स्वराज साळुंकेने 72, सुमित भोसलेने 42, अनिशा प्रशांतने 18 धावा केल्या. आनंदतर्फे ओम जकातीने 3, निलेश, करडी, सुप्रित यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल आनंद क्रिकेट अकादमीचा डाव 39.5 षटकात सर्व बाद 198 धावात आटोपला. ओम जकातीने 77, मिहिरने 24, सुप्रितने 19, समितने 18 धावा केल्या. जिमखानातर्फे वल्लभ, ओंकार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.