तालुका म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेसमोर लाल-पिवळा ध्वज उभा करण्यात आला आहे. हा ध्वज बेकायदेशीर असून तो हटवावा, या मागणीसाठी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले आहे. 21 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली असून तोपर्यंत काढला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर 21 रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचा निर्धार तालुका म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
रेल्वे ओव्हरब्रिजजवळील मराठा मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हा निर्धार करण्यात आला. मध्यवर्ती म. ए. समितीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा मोर्चा यशस्वी करण्याचे ठरविण्यात आले. याचबरोबर तालुक्मयातील बहुसंख्य ग्राम पंचायतींवर म. ए. समितीने तसेच मराठी भाषिकांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा दाखविले आहे. त्यांचे अभिनंदन या बैठकीत करण्यात आले.
या बैठकीमध्ये एल. आय. पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर यांच्यासह इतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. बैठकीला ऍड. सुधीर चव्हाण, अनंत निलजकर, अनिल पाटील, आर. सी. मोदगेकर, जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते..