देशात एकूण 1.33 कोटी रुग्ण संक्रमित-सक्रिय रुग्णसंख्या 11 लाखांवर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या दुसऱया लाटेत दिवसेंदिवस रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. देशात शनिवारी 1 लाख 52 हजार 879 कोरोना रुग्ण आढळले आहेत. महामारीच्या सुरुवातीपासूनच एका दिवसांत प्रथमच इतक्मया जास्त प्रमाणात कोरोना रुग्ण आढळले आहेत. 24 तासांत 90 हजार 584 रुग्ण बरे झाले आहेत. शनिवारी दिवसभरात 839 रुग्णांचा मृत्यू झाला.
कोरोनाचे थैमान महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांतही कायम आहे. कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड वाढला असून, फेब्रुवारीपासून होत असलेल्या रुग्णवाढीने शुक्रवारी नवा उच्चांक नोंदवला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील 24 तासांतील आकडेवारी जाहीर केली असून, देशातील नागरिकांना खडबडून जागे करणारेच आकडे समोर आले आहेत. 24 तासांत देशात पहिल्यांदाच तब्बल दीड लाखांच्या जवळपास रुग्ण आढळून आले असून 800 हून अधिक जणांना जीव गमावावा लागला आहे. देशातील मृतांच्या आकडय़ात मोठी वाढ होत असल्याने देशवासियांची चिंता वाढली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या 1 कोटी 33 लाख 58 हजार 805 एवढी झाली आहे. तसेच शनिवारी दिवसभरात 90 हजार 584 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून आतापर्यंत 1 कोटी 20 लाख 81 हजार 443 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात रिकव्हरी रेट वारंवार घसरत असून दोन दिवसांत हा 91.76 टक्क्मयांवरून 90.4 टक्क्मयांवर आला आहे. गेल्या तीन आठवडय़ात हा दर एकूण 8 टक्क्मयांनी घसरला आहे, सर्वात कमी रिकव्हरी रेट हा छत्तिसगड (79.1 टक्के) आणि महाराष्ट्र (82.2 टक्के) या राज्यांमध्ये आहे. शनिवारीही महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढीचा आलेख कायम राहिला. दिवसभरात 55 हजार 411 नवीन कोरोनाबाधित आढळून आले. छत्तिसगड आणि उत्तरप्रदेश या दोन राज्यांमध्येही नव्या बाधितांच्या संख्येमध्ये गेल्या दोन-चार दिवसात मोठी वाढ नोंद झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
राज्यात तब्बल 10,250 नवे रुग्ण
बेंगळूर
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्याही वेगाने वाढताना दिसत आहे. त्यानुसार गेल्या 24 तासात तब्बल 10 हजार 250 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 40 बाधितांचा बळी गेला आहे. राज्यातील एकूण बाधितांची संख्या 10,65,290 इतकी झाली असून 9,83,157 जणांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. मृतांची संख्या 12,889 वर पोहोचली आहे. रविवारी दिवसभरात 2,638 जण कोरोनामुक्त झाले असून राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 69,225 इतकी झाली आहे. दिवसभरात 1,32,706 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 10 हजारांवर नवे रुग्ण आढळून आले आहेत.