नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱया संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) 25 सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. गेल्या वषी नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या किसान आंदोलनाला अधिक ताकद देणे आणि शेतकऱयांचा आवाज बुलंद करणे हा या ‘भारत बंद’चा मुख्य उद्देश असल्याचे किसान मोर्चाचे नेते आशिष मित्तल यांनी सांगितले आहे. दिल्लीच्या सिंघू सीमेवर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. शुक्रवारी येथे देशभरातील शेतकरी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत 22 प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. या बैठकीत झालेल्या चर्चेअंती ‘बंद’ची घोषणा करण्यात आली. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.