भारतात कोरोना संसर्ग वाढत असल्याने या महामारीच्या विरोधातील युद्धात आता सुमारे 30 हजार डॉक्टर स्वयंसेवक सामील होणार आहेत. सेवानिवृत्त शासकीय तसेच सशस्त्र दल वैद्यकीय सेवा आणि खासगी चिकित्सकांसमवेत 30 हजारांपेक्षा अधिक डॉक्टर स्वंयसेवकांनी सरकारला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. 25 मार्च रोजी सरकारकडून सेवानिवृत्त शासकीय, सशस्त्र दल वैद्यकीय सेवेच्या तसेच खासगी डॉक्टरांना आवाहन करण्यात आले होते. 30100 स्वंयसेवक डॉक्टरांनी कोविड-19 विरोधातील युद्धात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
Add A Comment