क्रिकेटपटू मिताली राज हिच्या जन्मदिनीच तिच्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. वायकॉम18 स्टुडिओजने तिचा बायोपिक ‘शाबाश मिथु’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 4 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. या अद्भूत वृत्तासाठी मी किती आनंदी आहे हे मी सांगू शकत नाही. शाबाश मिथुच्या निर्मितीत सामील सर्व लोकांचे अभिनंदन असे मिताली राजने पोस्टर शेअर करत म्हटले आहे.

चित्रपटात तापसी पन्नू ही मिताली राजची व्यक्तिरेखा साकारत बॅट फिरविताना दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीजीत मुखर्जी यांनी केले आहे. तर पटकथा प्रिया एवन यांनी लिहिले आहे. वायकॉम18 कडून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. याच कंपनीने मेरी कॉम यांच्यावरील बायोपिकची निर्मिती केली होती. या चित्रपटात विजय राज तसेच प्रिया एवन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत.