1000 किलो वजनाची कार ः अत्याधुनिक सुविधांचा समावेश
वृत्तसंस्था/ पॅरिस
प्रेंच ऑटो कंपनी सिट्रोएनने आपली इलेक्ट्रिक कार ‘ओली’ सादर केली आहे. 1000 किलो वजनाची ही कार एका चार्जमध्ये 400 किमी धावणार असल्याची माहिती आहे. यात 40 केडब्ल्यू क्षमतेची बॅटरी आणि एकच इलेक्ट्रिक मोटर आहे. युरोपियन मार्केटमध्ये कारची किंमत 23 हजार पौंड (सुमारे 20.51 लाख रुपये) इतकी असल्याची माहिती आहे.
छप्पर आणि बोनेट मजबुत पुठ्ठय़ाचे
कारचे छत आणि बोनट पारंपरिक धातू किंवा स्टीलऐवजी पुठ्ठय़ाचे बनलेले असल्यामुळे ही कार अद्वितीय आहे. हा साधारण पुठ्ठा नसून एका खास हनीकॉम्ब फॉरमॅटने बनवलेला आहे. सर्व बाजूंनी मजबूत प्लास्टिक कोटिंग आहे.
सिट्रोएन ओली नवीन जीवनशैलीचा भाग
सिट्रोएनच्या संचालकांनी सांगितले की, ही कार सामान्य संकल्पनेतील कारपेक्षा वेगळी आणि चांगली आहे.
कारला एसयूव्ही बनवण्याची तयारी
मोटारींचे पुनर्नवीनीकरण आणि सहज दुरुस्तीही करता येते. तिसरी पिढी सुमारे 50 वर्षे टिकेल. उत्पादन प्रमुख म्हणाले की कंपनी 2019 पासून या मॉडेलवर काम करत आहे.