44 gram panchayat elections in Sindhudurga uncontested
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 44 ग्रामपंचायती बिनविरोध सरपंच व सदस्य संपूर्ण ग्रामपंचायत निवडून आले आहेत. त्यातील 30 ग्रामपंचायती वर भाजपचे कमळ फुलले आहे काही ग्रामपंचायतीमध्ये गाव विकास पॅनल आहे येत्या दोन दिवसात ते गाव विकास पॅनल ची सर्व मंडळी भाजपमय होणार आहे . जिल्ह्यातील जवळपास 225 ग्रामपंचायतीवर शत प्रतिशत भाजपच असणार आहे अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली सावंतवाडी तालुक्यातील सहा ग्रामपंचायत बिनविरोध झाले आहेत त्या सर्व भाजपच्याच आहेत . असेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग रविंद्र मडगावकर मनोज नाईक शहर मंडल अध्यक्ष अजय गोंधावळे महेश धुरी एकनाथ नाडकर्णी सुधीर दळवी आनंद नेवगी चंद्रकांत कासार आदी उपस्थित होते श्री तेली म्हणाले भाजप नंबर वन आहे. हे या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिद्ध झाले आहे भाजपमधून लढण्यास अनेक जण इच्छुक आहेत आणि गर्दी होत आहे जवळपास 44 हून अधिक ग्रामपंचायती बिनविरोध झाले आहेत.
सावंतवाडी / प्रतिनिधी