अभिनेत्री सान्या मल्होत्राचा चित्रपट ओटीटीवर येणार
सान्या मल्होत्रा आणि अभिमन्यू दसानी यांचा आगामी चित्रपट ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. चित्रपट निर्माता करण जौहरने सोशल मीडिया पोस्टद्वारे हा चित्रपट 5 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे.
सणासुदीच्या काळात अनोखी आणि अत्यंत प्रेमळ प्रेमकथा पाहण्यासाठी तयार रहा, मीनाक्षी सुंदरेश्वर 5 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर येत आहे, असे करणने म्हटले आहे. तसेच त्याने स्वतःच्या पोस्टमध्ये चित्रपटातील सान्या आणि अभिमन्यूच्या दृश्याचे एक छायाचित्र देखील शेअर केले आहे.
हा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट तामिळनाडूच्या मदुराई येथील पार्श्वभूमीवर बेतलेला आहे. हा चित्रपट एक युवा जोडप्याच्या समस्यांना अधोरेखित करेल. चित्रपटात मीनाक्षी ही व्यक्तिरेखा सान्या साकारत आहे. अभिमन्यू हा सुंदरेश्वर या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक सोनी यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती धर्मेटिक एंटरटेनमेंटच्या बॅनर अंतर्गत करण्यात आली आहे. या चित्रपटात नातेसंबंधांचे विविध पैलू, एकत्र कुटुंब आणि एका नव्या विवाहातील उलथापालथ दर्शविली जाणार आहे.