तुर्कस्तानात पुरातत्वतज्ञांना लागला शोध, ‘मद्याची देवता’ही सापडली
तुर्कस्तानात पुरातत्वतज्ञांना उत्खननात 5 हजार वर्षे जुन्या दोन भव्य मूर्तींचे अवशेष सापडले आहेत. या प्राचीन मूर्ती युनानची प्रेमदेवता अफरोडाइट आणि मद्याची देवता डायोनयसस यांच्या आहेत. या मूर्ती पश्चिम तुर्कस्तानातील एका प्राचीन शहरात मिळाल्या आहे, याच शहरात जगातील सर्वात पहिला शेअरबाजार सुरू झाला होता. पूर्वीच्या उत्खननात मूर्तींचे खालील हिस्से मिळाले होते. पण आता तुर्कस्तानच्या ऐजानोई शहरात 5 हजार वर्षे जुन्या मूर्तींचे शीर सापडले आहे.

प्रत्येक शीर लाइमस्टोनवर अत्यंत सुंदरपणे कोरण्यात आलेले आहे. प्रेमाच्या देवीचे शीर 19 इंच लांब तर मद्याच्या देवतेचे शीर 17 इंचांचे आहे. हे दोन्ही शीर आमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शोध आहेत. ग्रीसचा बहुदेववाद रोमन काळात स्वतःचे महत्त्व न गमावता दीर्घकाळ कायम राहिल्याचे यातून समजते असे उद्गार उत्खनन करणारे गोखान कोस्कून यांनी काढले आहेत.
रोमन काळात ऐइजानोई एक अत्यंत महत्त्वपूर्ण शहर होते. तेथे ग्रीक देवता जीउसचे मंदिर होते आणि स्टेडियम-थिएटर इत्यादी सुविधाही निर्माण करण्यात आल्या होत्या. ऐइजानोई शहर त्या काळात फरयगिआन्स आणि जीउसच्या मंदिरांतर्गत शासित या प्रांतातील मुख्य शहर होते. तेथे ख्रिस्तपूर्व 3 हजार वर्षांच्या काळातील अवशेष मिळाले आहेत.
या प्राचीन शहराचा शोध सर्वप्रथम युरोपीय प्रवाशांनी 1824 लावला होता. पण येथे 1926 मध्येच उत्खनन सुरू होऊ शकले. सध्या ज्या भागात उत्खनन सुरू आहे, तेथे आकर्षक मूर्ती तयार करण्याचा कारखाना होता असे मानले जात आहे. ग्रीक देवता हायजिइयाची मूर्ती सापडल्याची घोषणा यापूर्वी काही पुरातत्वतज्ञांनी केली होती. ही ग्रीक देवता आरोग्य आणि सफाईची प्रतीक म्हणून ओळखली जायची. या मूर्तींच्या मदतीने प्राचीन ग्रीक देवी-देवतांविषयी अनेक महत्त्वाची माहिती मिळत आहे.