प्रतिनिधी / कोल्हापूर
घरफाळा घोटाळा चौकशी समितीच्या अंतिम अहवालामध्ये महापालिकेचे करनिर्धारक आणि कर संग्रहक संजय भोसले व इतर कर्मचारी यांना दोषी ठरविले असून त्यांच्यावर आजपपर्यंत कारवाई झालेली नाही. भोसलेंसह दोषींववर बडतर्फीची कारवाई तातडीने करण्यात यावी, अन्यथा बुधवार 28 ऑक्टोबर रोजी आपण महापालिकेच्या समोर उपोषणाला बसणार आहोत, असा इशारा नगरसेवक भूपाल शेटे यांनी दिला आहे. या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलवकडे यांनाही पत्र पाठविले आहे.
या संदर्भात माहिती देताना नगरसेवक शेटे म्हणाले, संजय भोसले हे अतिरिक्त परीवहन व्यवस्थापक नसताना त्यांनी गेली 8 वर्ष महापालिकेचे वाहन आणि चालक यांचा वापर केला आहे. त्यावर झालेला खर्च 55 लाख रूपयांचा खर्च त्यांच्याकडून वसुल करून बडतर्फींची कारवाई झाली वारंवार मागणी करूनही केलेली नाही. त्यामुळे तत्काळ कारवाई झाली नाही तर माझ्यापुढे 28 ऑक्टोबरला उपोषण करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असेही शेटे यांनी म्हटले आहे.
शेटे म्हणाले, घरफाळा घोटाळयाचा तिसरा व अंतिम अहवाल चौकशी समितीने दिनांक 14 ऑगस्ट 2020 रोजी तत्कालिन आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्याकडे सादर केला. त्यांनी तो उपायुक्त निखिल मोरे यांच्याकडे पाठविला आहे. गेली दोन महिने झाले उपायुक्त मोरे यांनी यातील 14 प्रकरणे व कुळे 4 अशा 18 प्रकरणापैकी संजय भोसले 12 प्रकरणात दोषी आहेत, असे घरफाळा चौकशी समितीने अहवालात स्पष्ट केले आहे. या प्रकरणात आणखीन 8 कर्मचारी यांचा सहभाग असल्याचे व दोषी असल्याचे महापालिकेच्या संगणकीय अहवालात स्पष्ट केले आहे. याबाबतचे सिस्टीम मॅनेजर यांचे तीन स्वतंत्र अहवालांची पाहणी करावी, अशी मागणीही शेटे यांनी केली आहे.
Previous Articleकोरोना नियम तोडणाऱ्या 1961 जणांना दणका
Next Article वडर कॉलनीतील आयपीएल बेटींग अड्ड्यावर छापा
Related Posts
Add A Comment