कोरोनाला हरविण्याचीही कामगिरी नावावर
चंदिगढमधील हरभजन कौर या ‘मेड विथ लव्ह’ या फूड ब्रँडच्या संस्थापिका आहेत. या ब्रँड अंतर्गत त्या स्वतःच्या हाताने तयार केलेली बेसन बर्फी आणि लोणचे विकतात. हा व्यवसाय त्यांनी वयाच्या 90 व्या वर्षी सुरू केला होता. आता या व्यवसायाला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत.
हरभजन या अन्य भारतीय गृहिणींसारख्याच होत्या, आयुष्यभर स्वतःच्या कुटुंबाकरता त्यांनी अथक परिश्रम घेतले. कौर यांच्या नवऱयाला खायला आवडायचे आणि म्हणून त्या त्यांच्यासाठी आणि मुलींसाठी अनेक पदार्थ तयार करायच्या. त्यांच्या नवऱयाला त्यांच्या प्रत्येक डिशचा खूप अभिमान होता.
ब्रँडची अशी झाली सुरुवात

स्वावलंबी नसल्याचे एकमेव खंत असल्याचे कौर यांनी स्वतःच्या मुलीला सांगितले होते. आयुष्यात पैसे कधीच कमावले नसल्याचे त्यांनी म्हटले होते. हरभजन यांना मुलगी हे त्यांचे बोलणे इतके मनावर घेईल याची कल्पना नव्हती. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मुलीने चांगल्या जुन्या पाककृतींचा समावेश असलेल्या उद्योजक उपक्रमात प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कुटुंबाला वर्षानुवर्षे आवडलेल्या पाककृतींचा समावेश केला. त्यांनी बेसफ बर्फीपासून सुरूवात करण्याचा निर्णय घेतला. ही बर्फी तयार करत हरभजन यांनी स्थानिक बाजारात ती विकली आणि पहिल्यांदा स्वतः पैसे कमाविले.
महामारीवर मात
इथून सुरू झालेला प्रवास आजही थांबला नाही. दरम्यान कौर यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांनी त्यावर मात देखील केली. आजारातून बरे झाल्यावर कौर यांनी स्वतःच्या व्यवसायाकडे पुन्हा लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.