वार्ताहर/ लोणंद
लोणंद नगरपंचायतीच्या नगरसेविका तृप्ती राहुल घाडगे यांना तीन अनोळखी व्यक्तीनी चाकूचा हातावर वार करून त्यांच्या गळ्यातील मिनिमंगळसूत्र मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 19 हजार 850 रुपयांचा एवज लंपास केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरून मिळालेली अधिक माहिती अशी की, लोणंद गावच्या हद्दीत सोमवारी पावणे दहाच्या सुमारास निंबोडी (ता. खंडाळा) रोडवरील इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये मीटिंगसाठी तृप्ती घाडगे या त्यांच्या गाडीवरून जात असताना पाठीमागील येणाऱया मोटारसायकलवरून तीन अनोळखी चोरटय़ांनी येऊन त्यावरील एकाने मोटारसायकल थांबवून त्याच्याकडील सुऱयाने धाक दाखवत गळ्यातील सोन्याचे मणिमंगळसूत्र 8 ग्रॅम वजनाचे एक मोबाईल व 1850 रोख रक्कम असा एकूण 19 हजार 850 रुपयांचा ऐवज जबरीने चोरून नेला आह.s चोरी करताना चोरटय़ाने तृप्ती घाडगे यांच्या डाव्या हातावर चाकूचा वार करून त्यांना जखमी केले आहे अशी फिर्याद तृप्ती घाडगे यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिली असून लोणंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पंचनामा पोलिसांनी करून तीन अनोळखी इसमांचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेचा अधिक तपास व्ही. के. धुमाळ हे करीत आहेत.