लिपस्टिकपासून आयलाइनर लावण्याचा प्रकार
महिला आणि मुलींना मेकअप करण्याची मोठी आवड असते, परंतु केवळ माणसांमध्ये महिलांनाच मेकअपची आवड आहे असे तुमचे मानणे असेल तर तुम्ही चुकत आहात. सोशल मीडियावर एक अशीच श्वान व्हायरल होत असून ती मांस बघून नव्हे तर मेकअप बॉक्स बघून आनंदी होते. या श्वानाला मेकअप करविण्याची मोठी आवड आहे. स्वतःच्या मालकीणीला मेकअप करताना पाहिल्यावर ती त्वरित तेथे पोहोचते.
ब्रुकलिन नावाच्या या श्वानाचा मेकअप टय़ुटोरियल प्रचंड व्हायरल होत आहे. सर्वात मजेशीर बाब म्हणजे ब्रूकलिन स्वतःच्या मेकअपची सर्व उत्पादने स्वतःच निवडते. सर्व मेकअप शेड्स निवडून स्वतःच्या मालकिणीला देते आणि मग त्याच शेड्सद्वारे तिचा मेकअप होतो. ब्रुकलिन आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. लोकांनी तिला मोस्ट स्टायलिस्ट डॉगचा टॅग देखील दिला आहे. लोकांना ही सुंदर श्वान अत्यंत पसंत पडत आहे.

ब्युटी सिक्रेट
ब्रुकलिनचे ब्युटी सिक्रेट लोकांना अत्यंत पसंत पडत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत ब्रुकलिनने लोकांसोबत स्वतःचे ब्युटी सिक्रेट शेअर केले आहे. ब्रुकलिन केवळ स्वतःसाठी फाउंडेशन निवडत नाही तर तिला हायलाइटरपासून स्वतःच्या आईलॅशेस सेट करणेही आवडते. या मेकअप टय़ुटोरियलला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यात साधारण लुकपासून ब्रुकलिनला अधिक सुंदर होताना पाहिले जाऊ शकते. याचबरोबर ब्रुकलिनने हेयरबँडही लावला आहे.
कॉमेंट्सचा वर्षाव
व्हिडिओ पाहून अनेक लोकांनी त्यावर कॉमेंट केली आहे. याचबरोबर अनेकांनी मालकिणीला दुषणे देखील दिली आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर नकारात्मक टिप्पणी केली असली तरीही अनेक जणांना ब्रुकलिन अत्यंत पसंत असून तिचे कित्येक फॉलोअर्स आहेत.