ब्ल्यू व्हेल हा जगातील सर्वात मोठा जीव
ब्ल्यू व्हेल या माशाला जगातील सर्वात मोठा जीव मानले जाते. 30 मीटरपर्यंत लांब आणि 200 टन वजनाच्या या जीवाचे हृदय किती मोठे असेल याचा विचार करून पहा? ब्ल्यू व्हेल माशाच्या हृदयाचा आकार इतका मोठा आहे की ते पाहून लोकांना धक्काच बसतो. अलिकडेच सोशल मीडियावर ब्ल्यू व्हेल माशाच्या हृदयाचे एक छायाचित्र प्रसारित झाले आहे. हे छायाचित्र दिग्गज उद्योजक हर्ष गोयंका यांनी पोस्ट केले आहे. गोयंका हे ट्विटरवर स्वतःच्या रंजक आणि मजेशीर ट्विट्ससाठी लोकप्रिय आहेत. अशा स्थितीत त्यांनी समुद्रातील या विशालकाय जीवाच्या हृदयाचे छायाचित्र शेअर केल्यावर ते व्हायरल होणे साहजिकच आहे.

हर्ष गोयंका यांनी 13 मार्च रोजी कॅनडाच्या ‘रॉयल ओंटारियो म्युझियम’मध्ये संरक्षित आणि प्रदर्शित ब्ल्यू व्हेलमाशाच्या हृदयाचे छायाचित्र ट्विटरवर शेअर केले आहे. ‘हे ब्ल्यू व्हेलचे संरक्षित हृदय आहे, याचे वजन 181 किलोग्रॅम आहे. हे हृदय 1.2 मीटर रुंद आणि 1.5 मीटर लांब आहे. या हृदयाचे ठोके 3.2 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरून सहजपणे ऐकले जाऊ शकतात’ असे गोयंका यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
गोयंका यांचा ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत याला 2 हजारांहून अधिक लाइक्स आणि 1 लाख 68 हजारांहून अधिक ह्यूज मिळाल्या आहेत. तर अनेक युजर्सनी कॉमेंट केली आहे. रोपांपासून प्राणी आणि मनुष्यांपर्यंत ब्रह्मांडाची स्वतःची सृजनात्मकता आहे. मुंगीपासून व्हेलपर्यंत सर्वांना अत्यंत सुंदरपणे अस्तित्व प्रदान करण्यात आले असल्याचे एका युजरने नमूद केले आहे. एका युजरने या हृदयाच्या आकाराइतके तर माझे मुंबईतील घर असल्याची मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.