सोबत नेली पत्नीचा फोटो असणारी उशी
फिलिपाईन्समधील रेमंड फॉर्टुनाडो सध्या चर्चेत आहे. त्याचे कारण पत्नीसोबत फिलिपाईन्समधील कोरोन शहरात फिरण्यासाठी त्याची योजना होती. परंतु त्याची पत्नी जोआने महत्त्वाचे काम असल्याने ट्रिपवर येऊ शकली नव्हती. जोआने एक फ्रीलान्स मॉडेल आहे, तिला एक प्रोजेक्ट मिळाल्याने तिला ट्रिपवर जाता आले नाही. अशा स्थितीत रेमंडने एकटाच ट्रिपवर केला, परंतु पत्नीसोबत फिरण्याचा शब्द पूर्ण करण्यासाठी त्याने स्वतःसोबत पत्नीचा चेहरा प्रिंट केलेली एक उशी नेली.

त्याने फेसबुकवर अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ पोस्ट केले असून ते व्हायरल होत आहेत. या छायाचित्रे आणि व्हिडिओंमध्ये रेमंड स्वतःच्या पत्नीचा चेहरा प्रिंट केलेल्या उशीसोबत दिसून येतो. काही ठिकाणी तो समुद्र किनाऱयावर या उशीसोबत पोझ देताना दिसून येत आहे. तर कुठे नौकेवर बसून पोझ देत आहे. एका छायाचित्रात उशीसोबत डायव्हिंग करताना परिधान केला जाणारा ऑक्सिजन मास्कही घातलेल्या स्थितीत नजरेस पडतो. या रोमँटिक व्हेकेशनवर जाण्यासाठी त्याने उशीवर जे छायाचित्र तयार करवून घेतले ते एखाद्या मीमपेक्षा कमी नाही.
रेमंडने 7 जुलै रोजी ही छायाचित्रे पोस्ट केली होती आणि आता ही पोस्ट व्हायरल झाली आहे. 16 हजारांहून अधिक लोकांनी याला शेअर केले, तर 20 हजारांहून अधिक जणांनी लाइक केले आहे. ट्रिपवर मी जात असताना पत्नी नाराज होती, परंतु तेथून छायाचित्रे पोस्ट करू लागल्यावर ती आनंदी झाल्याचे रेमंडने म्हटले आहे.