पुणे / वार्ताहर :
राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संर्दभात बदनामीकारक व आक्षेपार्ह मजकूर ट्विटरवर पोस्ट करुन बदनामी केल्याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप सोमनाथ सातव (वय 38, रा. वाघोली, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अनिल हरपळे यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा : मुंबई-पुणे मार्गावर रेल्वेचा ‘ब्रेक’
आरोपी अनिल हरपळे याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन 16 नोव्हेंबर रोजी ‘खुर्ची मिळवली पण होती नव्हती ती इज्जत गमावली. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र जितक्या शिव्या खातात तितक्या कोणी खात नसेल. काही वर्षात तुमचा नारायण राणे होईल (कुत्रं विचारणार नाही तुम्हाला), असा मजकूर लिहित सोबतच ‘तुमच्या सोबत 24 तास राहणारा, सत्ता भोगणारा व्यक्ती खंजीर खुपसतो, माझ्यासोबत तुम्ही बेईनामी कराल तर मी नक्कीच बदला घेईन. बेईमानाला जागा दाखवावी लागते, दाखवली. होय, मी बदला घेतला’ या फडणवीस यांच्या स्टेटमेंटचा फोटो ट्विट करत त्यावरही आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता.