ऑनलइन टीम/तरुण भारत
Minister Abdul Satta Inquiry About Election Affidavit Issue : शिंदे गटातील कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या अडचणी वाढणार आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रावरून त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सिल्लोडच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मंत्री अब्दुल सत्तार यांची निवडणूक प्रतिज्ञापत्र प्रकरणी चौकशी करण्याचे हे आदेश पोलिसांना (Police) दिले आहेत. याप्रकरणाची चौकशी करून ६० दिवसात अहवाल देण्यास न्यायालयाने सांगितले आहे. (abdul sattar may again in trouble sillod court order of inquiry about election affidavit issue)
सत्तार यांनी निवडणुकीसाठी सादर केलेल्या शपथ पत्रात त्यांनी शेतजमीन, बिगरशेती जमीन, वाणिज्य इमारती, निवासी इमारती, शैक्षणिक अहरते बाबत तफावत असलेली माहिती सादर केली असल्याचा आरोप केला होता, या प्रकरणी आता सिल्लोड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने मंत्री अब्दुल सत्तार यांच्या केसमध्ये पोलिसांना (Police) सखोल चौकशीचे आदेश दिलेत.
हे ही वाचा : महाराष्ट्राचा यूपी-बिहार करायचाय का?
कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि इतर काही जणांविरोधात सिल्लोडमधील महेश शंकरपेल्ली आणि पुण्यातील डॉक्टर अभिषेक हरीदास यांनी तक्रार दाखल केली होती. निवडणुकीवेळी अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या शपथ पत्रात शेतजमीन, बिगर शेती जमीन, वाणिज्य इमारती, निवासी इमारती यासह शिक्षणाबाबत दिलेल्या माहितीत फरक होता असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयाने पोलिसांनी तपासाचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी अहवाल सादर केला पण यात त्रुटी असल्याचं फिर्यादींनी न्यायालयासमोर सांगितले. आता पुन्हा पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश न्यायालयाने दिलेत.
काय आहे आक्षेप?
अब्दुल सत्तार यांनी २०१४ आणि २०१९ वेळी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या शपथपत्रात चुकीची माहिती दिली आहे. ज्या जमिनीची किंमत २०१४ मध्ये जास्त होती त्याची किंमत २०१९ मध्ये कमी जदाखवण्यात आली आहे. तर शैक्षणिक माहितीतही गोंधळ असल्याचा दावा केला गेला आहे. २०१९ च्या शपथपत्रात अब्दुल सत्तार हे १९८४ ला FYBA ला असल्याचं सांगितलं आहे. तर २०१४ च्या शपथपत्रात HSC 1984 आणि BA अपियर्ड असल्याचं सांगण्यात आलंय. आता या प्रकरणी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात सिल्लोड न्यायालयात सीआरपीसी २०० अंतर्गत भादंवि कलम १९९, २००, ४२० आणि ३४, तसंच लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ च्या कलम १२५ नुसार याचिका दाखल केली आहे.
हे ही वाचा : १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या; मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती