प्रतिनिधी / ओरोस
राज्य भरात गाजलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय धान्य घोटाळा प्रकरणातील चार संशयितांची निर्दोष मुक्तता झाली आहे.यामध्ये संतोष अंकुश बांदेकर ५४ रा. माणगाव कुडाळ (तत्कालीन पुरवठा निरीक्षक), भरत नारायण गंगावणे, ६१ रा. पिंगुळी .(तत्कालीन गोदाम व्यवस्थापक), वासुदेव विष्णू शिवगण, ६८ रा. कासार्डे कनकवली, (तत्कालीन गोदाम पालक) या तीन शासकीय कर्मचाऱ्यांसह धान्य दुकानदार अनिल सीताराम खोचरे. ६८ रा. घावनले कुडाळ यांचा समावेश आहे.
कुडाळ येथील शासकीय गोदामातील bpl योजने अंतर्गत तांदूळ आणि गहू मिळून १०,४३,२४८ रुपये किमतीच्या धान्याचा घोटाळा केल्या प्रकरणी या संशयितांवर दोषारोप ठेवण्यात आला होता. २००६ सालि हे प्रकरण घडले होते. शासकीय धान्याची स्वताच्या फायद्या साठी संगनमताने अफरा तफर करून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात झालेल्या खटल्याच्या सुनावणीत सबळ पुरावा अभावी चौघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.संशयितांच्या वतीने अड संग्राम देसाई आणि अड अशपाक शेख यांनी काम पाहिले.
Trending
- वेंगुर्लेत आंतर महाविद्यालयीन नेमबाजी स्पर्धा संपन्न
- सावंतवाडीतील धोकादायक झाडे प्रशासनाने येत्या १५ दिवसात तोडावीत – संजू परब
- कोल्हापूर विभागीय हॉलीबॉल स्पर्धा वेंगुर्ल्यात संपन्न
- गांधी जयंतीदिनी ‘विश्वकर्मा’ योजना प्रारंभ
- भाजप महिला सशक्तीकरणास कटिबद्ध नाही
- जागतिक ‘बीच व्हॉलीबॉल’ स्पर्धा पर्यटनाला पुरक
- भाजपच्या तिन्ही महिला आमदार मंत्रिपदासाठी सक्षम : तानावडे
- गोव्यात आज अनंत चतुर्दशी व्रत