नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकित रोज नविन ट्विस्ट घडत असताना आज कॉंग्रेस पक्षाने युथ कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांचे निलंबन केले आहे. याअगोदर सत्यजीत तांबे यांचे वडिल आणि कॉंग्रसचे आमदार सुधीर तांबे यांना निलंबित केले होते. त्यानंतर सत्यजित तांबे यांची भाजपशी जवळीक वाढल्यावर हा निर्णय कॉंग्रेस पक्षाच्या क्षेष्ठींनी घेतला असल्याचे सुत्रांनी सांगितले. या कारवाईमुळे राज्यासतील राजकिय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकिसाठी कॉंग्रेसकडून विद्यमान आमदार सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. पण त्या जागेसाठी त्यांनी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म मिळूनही अर्ज दाखल केला नाही. त्या ऐवजी त्यांनी आपला मुलगा सत्यजीत तांबे यांचा अर्ज दाखल केला. त्यामुळे नाशिक च्या निवडणुकीत रंगत दार वाढली होती.
सुधीर तांबे यांच्या या कृतीमुळे राज्यातील कॉंग्रेस नेते नाराज होऊन त्यांनी तांबे यांना पक्षातून निलंबित केले. सुधीर तांबे यांच्य़ापाठोपाठ सत्यजीत तांबे यांच्यावर ही निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता राजकिय क्षेत्रातून व्यक्त केली जात होती. अखेर या संबंधिचा निर्णय समोर आला असून सत्यसजीत तांबे यांनी 6 वर्षासाठी निलंबित केले आहे.
Related Posts
Add A Comment