सुळेभावी-शिंदोळी भागातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह
बेळगाव : बेळगाव ग्रामीण काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा शनिवारी सायंकाळी सुळेभावी-शिंदोळी भागात भव्य रोड शो झाला. या रोड शोला कन्नड अभिनेता शिवराज कुमार यांची विशेष उपस्थिती होती. त्यामुळे लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. लक्ष्मी हेब्बाळकर यांना पुन्हा एकदा निवडून आणणार असा निर्धार या रोड शोच्या माध्यमातtन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व माहिलांनी केला आहे.

शिवराज कुमार यांची पत्नी गीता शिवराज कुमार यांच्या हस्ते प्रारंभी सुळेभावी येथील लक्ष्मीदेवीचे पूजन करण्यात आले. यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी हे उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर मोठ्या जल्लोषात रोड शोला प्रारंभ करण्यात आला.
शिवराज कुमार येणार असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.