मुंबई : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुण्यातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या सदस्यांनी निषेधादरम्यान केलेल्या पाकिस्तान समर्थन घोषणांबद्दल बोलताना एकनाथ शिंदे सरकारवर हल्ला चढवला आहे. या घटनेला राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे “अपयश” असल्याचे म्हटले आहे.
“पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा देणार्यांवर सरकारने त्वरीत आणि कठोरपणे पाऊले उचलली पाहिजेत. कोणीतरी अशा प्रकारचे धाडस करून मोकळे फिरत आहेत. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचे हे मोठे अपयश आहे,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.
“पाकिस्तान झिंदाबाद” च्या घोषणा देत असलेल्या निदर्शकांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर तीव्र टीका झाली. वादग्रस्त इस्लामिक संघटना पीएफआयने पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते. पीएफआयच्या नेत्यांच्या अटकेनंतर त्यांच्या विविध ठिकाणांवर छापे टाकल्यानंतर ही निदर्शने करण्यात आली. या निर्शनात पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्या गेल्याचा दाव केला जातोय. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहीतीनुसार पोलिसांनी किमान ४० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. तर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्याचा कसून तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. “आम्ही पीएफआय सदस्यांविरुद्ध बेकायदेशीर गर्दी जमवल्याबद्दल आधीच गुन्हा दाखल केला आहे.” पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी सांगितले. राष्ट्रीय तपास संस्थेने गुरुवारी पीएफआयवर देशव्यापी कारवाई करून15 राज्यांतील 100 हून अधिक पीएफआयचे नेते आणि कार्यकर्त्यांना दहशतवादी कारवायांचे समर्थन केल्याप्रकरणी अटक केली आहे.
Previous ArticleIran Hijab Row : ‘हिजाब’ विरोधात ७०० जणींना अटक, ४१ लोकांचा मृत्यू ; सोशल मीडियावरही बंदी
Next Article रोटरी क्लबच्या माध्यमातून मोफत चष्मे वाटप
Related Posts
Add A Comment