वृत्तसंस्था/ इंडियन वेल्स
सामन्यावेळी झालेल्या घोटय़ाच्या दुखापतीकडे दुर्लक्ष करीत रशियाच्या डॅनील मेदवेदेव्हने येथे सुरू असलेल्या इंडियन वेल्स स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हचे आव्हान संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
मेदवेदेव्हने व्हेरेव्हवर चुरशीच्या लढतीत 6-7 (5-7), 7-6 (7-5), 7-5 अशी मात केली. मेदवेदेव्हचा हा सलग 17 वा विजय असून पाचवे मानांकन मिळालेल्या मेदवेदेव्हने या सामन्यात प्रभावी खेळ केला. स्पेनचा फोकिना किंवा चिलीच क्रिस्टियन गॅरिन यापैकी एकाशी त्याची पुढील लढत होईल. अन्य एका सामन्यात यानिक सिनरने पहिल्यांदाच या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठताना स्वित्झर्लंडच्या स्टॅनिसलास वावरिंकाला पराभवाचा धक्का दिला. त्याने ही लढत 6-1, 6-4 अशी एकतर्फी जिंकली. विद्यमान विजेत्या टेलर फ्रिट्झविरुद्ध त्यांची पुढील लढत होईल. फ्रिट्झने मार्टन फुक्सोविक्सवर 6-4, 6-3 असा विजय मिळविला.