दाक्षिणात्य अभिनेत्री रेवती मुख्य भूमिकेत
‘ऐ जिंदगी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रसारित करण्यात आला आहे. सत्यघटनेवर आधारित या चित्रपटात सत्यजीत दुबेचा उत्तम अभिनय पहायला मिळणार आहे. या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री रेवती मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. प्लाटून वन फिल्म्स, बुटीक फिल्म स्टुडिओने ‘ऐ जिंदगी’ चित्रपट निर्माण केला असून तो भारतासह अमेरिकेत प्रदर्शित होणार आहे.
लिव्हर सिरोसिस या गंभीर आजाराशी झगडणाऱया एका 26 वर्षीय युवकाची कहाणी यात दर्शविली जाणार आहे. रेवती या चित्रपटात एका समुपदेशिकेची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट डॉ. अनिर्बान बोस यांनी दिग्दर्शित sकला असून त्यांनीच याची पटकथा लिहिली आहे. अनिर्बास यांना बॉम्बे रेन्स, बॉम्बे गर्ल्स, माइस इन मेन अणि द डेथ ऑफ मिताली दत्तो या कादंबऱयांसाठी ओळखले जाते. ऐ जिंदगी हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
चहुबाजेला निराशेचा अंधकार असूनही विजय मिळविण्याच्या निर्धाराही कहाणी या चित्रपटात दिसून येणार आहे. ट्रेलरमध्ये सत्यजीत दुबेचा बहारदार अभिनय दिसून येतो. मराठी अभिनेत्री मृण्मयी गोडबोल देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
हा चित्रपट माझ्या अनुभवातून तयार झाला आहे. अशा प्रकारच्या घटना मी डॉक्टर म्हणून पाहिल्या आहेत. ही कहाणी अत्यंत सुंदर असल्याने स्वतःच्या जीवनातील दोन वर्षे मी या चित्रपटाकरता समर्पित केली असल्याचे अनिर्बान यांनी म्हटले आहे.