Shraddha Murder Case In Delhi : ‘रागाच्या भरात प्रेयसी श्रद्धा वालकरची हत्या करून तिचे तुकडे केल्याची कबुली आरोपी आफताब पुनावालानं दिली आहे. दिल्लीतील साकेत कोर्टात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी त्याला हजर करण्यात आलं होतं.यावेळी त्याने हा जबाब दिला. याशिवाय कोर्टानं या प्रकरणाची सुनावणी करताना आज आफताबच्या पोलीस कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.
दिल्लीतील साकेत कोर्टासमोर गुन्ह्याची कबुली देताना आरोपी आफताबनं म्हटलं आहे की, मी रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली, सगळ्या गोष्टी काही क्षणात घडल्या. मी पोलिसांना तपासात सहकार्य करत असून घटना सहा महिन्यांपूर्वी घडलेली असल्यानं मला याबाबतच्या अनेक गोष्टी आठवत नसल्याचं आफताबनं कोर्टात सांगितलं आहे.
यादरम्यान आता टी.व्ही अभिनेता इमरान नाजिर खाननं काही शॉकिंग खुलासे केले आहेत. श्रद्धा वालकर त्याची मैत्रिण होती. इमरानच्या म्हणण्यानुसार श्रद्धा वालकरने त्याला जवळपास दोन वर्ष आधी सांगितलं होतं की तिचा बॉयफ्रेंड ड्रग्जचे सेवन करतो आणि तिला त्याची ही सवय सोडवायची आहे. इमरान जवळ यासाठी श्रद्धानं मदत मागितली होती.आफताबचं हे व्यसन सोडवण्यासाठी तिनं मला एखाद्या व्यसनमुक्ती केंद्राविषयी विचारलं होतं. तिला वाटत होतं की आफताब त्या केंद्रात जाऊन ठीक होईल’.असाही खुलासा केला आहे. यामुळे या प्रकरणात आत वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत.
Previous Articleजर्मनच्या अंध गायिकेच्या आवाज ऐकू येत आहे कांताराचा विराज रुपम….
Related Posts
Add A Comment