इस्रायलमधून आले रब्बी

अमेरिकेचा वर अन् राज्यातील वधू केरळमध्ये एक विवाहसोहळा चर्चेचा विषय ठरला आहे. येथे ज्यू समुदायाने 15 वर्षांनी ज्यू प्रथा-परंपरांसोबत पारंपरिक विवाह सोहळा पार पाडला आहे. याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. परंतु एका खासगी रिसॉर्टमध्ये आयोजित या विवाह सोहळ्यात केवळ कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवारच सामील झाला होता.
हुप्पात पार पडला सोहळा
इस्रायलचे रब्बी एरियन टायसन यांनी विवाहसोहळा पूर्ण करविला आहे. विवाहसोहळा एक छत्रात (घराचे प्रतीक) पार पडला असून त्याला हुप्पा म्हटले जाते. केरळमध्ये सिनेगॉगबाहेर झालेला हा पहिला ज्यू विवाहसोहळा होता. केरळमध्ये अशाप्रकारचे विवाहसोहळे फारच कमी प्रमाणात होत असल्याने याचे महत्त्व वाढले आहे. राज्यात यापूर्वीचा ज्यू विवाहसोहळा 2008 मध्ये थेक्कुमभगम सिनेगॉग मट्टनचेरीमध्ये झाला होता. कोचीतील सुंदर कुम्बलम सरोवराच्या काठावर केरळमधील ज्यू समुदायाने स्वत:च्या प्रथा-परंपरांचे पालन करत 15 वर्षांनी पारंपरिक विवाह सोहळ्याचा आनंद घेतला आहे. मागील 70 वर्षामध्ये केरळमधील हा केवळ पाचवा ज्यू विवाह आहे. लाल आणि पिवळ्या फुलांनी तयार हुप्पाखाली (घराचे प्रतीक) भारतीय आणि अमेरिकन वंशाचे ज्यू, राचेल बिनॉय मालाखाई आणि रिचर्ड जावरी रोवे यांनी विवाहाची शपथ घेतली आणि अंगठ्यांचे आदान-प्रदान केले. विवाह पूर्ण प्रथा-परंपरांसोबत करविण्यासाठी इस्रायलमधून एक रब्बी (ज्यू धर्मातील पुजारी) बोलाविण्यात आला होता. या विवाह सोहळ्यातील वर हा अमेरिकेतील डाटा सायंटिस्ट असून त्याने केरळमधील माजी पोलीस अधिकारी बेनोय मलखाई यांची कन्या राहेलसोबत विवाह केला आहे. रिचर्ड जाचरी रोवे एक अमेरिकन नागरिक असून नासामध्ये कार्यरत आहे. तर वधू देखील अमेरिकेत काम करतेय.