आमदार राजेश फळदेसाई यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /कुंभारजुवे
निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मी कुंभारजुवेत मतदारसंघात समाजसेवा सुरू केली होती. त्यामुळे मतदारसंघातील बहुतेक मतदारांशी माझी ओळख झाली होती. मतदारांकडून निवडणुक लढविण्याचा मला आग्रह झालेला होता. त्यामुळेच 101 टक्के मी निवडून येणार याची मला खात्री होती. मतदारसंघातील समस्यांची मला जाणीव असल्याने मतदारसंघाचा चौफेर विकास करण्याचे एकच ध्येय आता मी बाळगून आहे. इतर मतदारसंघाप्रमाणेच पुंभारजुवे मतदारसंघातही पाणी, वीज, रस्ते बेरोजगारी, खाजन शेती कचरा समस्या आहेतच. पण टप्प्याटप्प्याने सर्व समस्या संपविण्यासाठी मी पावले उचलली असून पुढील दोन वर्षांतच पुंभारजुवे मतदारसंघ समस्याविरहित झालेला दिसेल, असे कुंभारजुवे मतदारसंघाचे हरहुन्नरी आमदार राजेश फळदेसाई यांनी सांगितले.
बेरोजगारांना नोकरी देण्यात काही प्रमाणात यश!
मतदारसंघात अनेक युवक बेरोजगार आहेत. सरकारी नोकरीसाठी, मुलाखती घेण्यासाठी आलेले कॉल लेटर घेऊन मोठय़ा अपेक्षेने ते माझ्याशी संपर्क साधतात. मी माझ्या कुवती प्रमाणे त्यांना सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो. काही प्रमाणात नोकऱया देण्यातही मी सफलही झालो आहे. प्रत्येकाला सरकारी नोकऱया देणे कधीच शक्य होणार नाही. त्यासाठी औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्यात माझ्या मतदारसंघातील युवकांना नोकरी देण्यासाठी माझे प्रयत्न चालले असून आतापर्यंत खोर्ली, कुंडई, वेर्णा औद्योगिक वसाहतीत आतापर्यंत 35 ते 40 युवकांना नोकरी मिळवून देण्यात मी यशस्वी ठरलो आहे. खोर्ली तिसवाडी येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या आस्थापनाच्या मालकांशी मी बैठक घेतली असून नोकऱयासाठी कुंभारजुवे मतदारसंघातील युवकांना प्राधान्य देण्यास सांगितले आहे. नोकरीसाठी त्यांना ज्या प्रकारचे प्रशिक्षण हवे असेल ते प्रशिक्षण मी स्वखर्चाने देण्याची तयारीही दर्शविली आहे. अन्यथा कंपन्यानी त्यांना हवे असलेले प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी की ज्यामुळे नोकऱया स्थानिकांनाच मिळेल. मला खात्री आहे की पुढील काही दिवसांतच मतदारसंघातील बऱयाच बेरोजगार युवकांना नोकरी देण्यास यशस्वी होईन. तसेच जर काहीजणांना स्वयंरोजगार सुरू करायचा असेल तर माझ्या वतीने प्रत्येकी पन्नास हजार रुपयांपर्यंत मदत देण्याची माझी तयारी आहे. ज्यामुळे माझ्या मतदारसंघातील युवक बेरोजगार राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.
मतदारसंघातील काही भागात जसे दिवाडी, कदंब पठार, नावेलकर इस्टेट व इतर काही ठिकाणी पाण्याची समस्या होती. पण आता दिवाडी येथील पाण्याची समस्या जवळ जवळ 95 टक्के मिटलेली आहे. येथील पाणी विभागाचे कर्मचारी नियमित व व्यवस्थितपणे पाणी सोडत असल्याने मार्चपासून आतापर्यंत तरी पाण्याची समस्या जाणवली नाही. त्यासाठी ते कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. कदंब पठारावर असलेल्या पाण्याच्या टाकीत अपेक्षित प्रमाणात पाणी साठत नसल्याने त्या ठिकाणी आता नवीन टाकी बांधण्यात आली असून लवकरच त्या ठिकाणची पाण्याची समस्या संपेल. पाणी पुरवठय़ाविषयी ज्या छोटय़ा- छोटय़ा तक्रारी असतात त्यांचे नियतितपणे निरसन करण्यात येते, असे आमदारांनी सांगितले.
वीज पुरवठय़ाविषयी काही बारीक-सारीक तक्रारी असल्यास वेळीच निरसन होत असल्याने काही गंभीर समस्या उद्भवत नसल्याचे त्यांनी सांगितले. वीज खात्यातील कर्मचाऱयांचेही चांगले सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मतदारसंघातील खाजन शेत जमिनीविषयी बोलताना आमदारांनी सांगितले की, करमळी, खोर्ली, दिवाडी, कुंभारजुवे येथील खाजन शेती करणाऱया शेतकऱयांची आपण बैठक घेतली असून खाजन शेती करण्याची त्यांची अजुनही तयारी आहे. पण खाजन जमिनीत पाणी भरत असल्याने त्यांना ते शक्य होत नाही. तिसवाडी मामलेदारांनी पाणी सुकविण्याचे आदेश देऊनही खाजनाच्या मानशीचे पावणीदार मामलेदारांच्या आदेशाचे पालन करीत नाही. याची दखल मुख्यमंत्र्यांनीही घेतली असून यापुढे मामलेदारांना कडक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. मासे माफिया व मामलेदारा यांचे काहीतरी साटे-लोटे असल्याने खाजन शेत जमिनीत पाणी भरून ठेवणाऱयांवर कारवाई होत नसल्याचे ते म्हणाले.
गवंडाळी येथील रेल्वे फाटकाजवळ सकाळच्यावेळी त्या मार्गावरून प्रवास करणाऱयांना होणाऱया गैरसोयीबद्दल आमदार फळदेसाई यांनी सांगितले की, मी आमदार होण्यापूर्वीपासून या समस्येची मला जाणीव आहे. म्हणून आमदार झाल्यानंतर मी या गोष्टीत लक्ष घातले असून मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत चर्चाही झाली आहे. मा. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच त्या ठिकाणी फ्लाय ओव्हर पुल बांधण्यासाठी प्राथमिक कामाला म्हणजेच जागा संपादन करणे, इतर तांत्रिक गोष्टी तपासणे आदी कामांना सुरुवात होणार आहे. कोकण रेल्वेच्या अधिकाऱयांबरोबरही आपण बैठक घेतली असून त्यांच्याकडूनही फ्लायओव्हर पूल उभारण्यासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यापूर्वी सदर ठिकाणी लवकरच पोलीस तैनात करण्यात येईल, असे आमदार फळदेसाई यांनी सांगितले.
कदंब पठारावरील कचरा प्रकल्प प्रकरणी जतनेसोबत!
कदंब पठारावर कचरा प्रकल्प उभारणी संदर्भात बोलताना आमदार फळदेसाई म्हणाले की, जुने गोवे एक जागतिक पर्यटन स्थळ आहे. देशासह संपूर्ण जगातून वर्षभर पर्यटकांची येथे ये जा असते, म्हणूनच हा कचरा प्रकल्प कदंब पठरावर होऊ नये, असे माझे मत आहे. जुने गोवे व कदंब पठारावरील नागरिकांनाही हा प्रकल्प येथे नको आहे. मी माझ्या मतदारांसोबत कचरा प्रकल्पाच्या विरोधात ठामपणे उभा राहणार असून कोणत्याही स्तरावर जाण्याची आपली तयारी असेल.
कुंभारजुवे येथील नागरिकांना गवंडाळी पुलावरून गेल्यावर मोठा वळसा घेऊन गावात प्रवेश करावा लागतो. तो चुकविण्यासाठी गवंडाळी पुलाकडून जवळच्या शेतातून नवीन रस्ता तयार करण्याचे आपण ठरविले असून येत्या सहा महिन्यांत स्वखर्चाने हा रस्ता तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे आमदार फळदेसाई यावेळी म्हणाले. कुंभारजुवे-गवंडाळी फेरीबोट बहुतेकवेळा बंद असते अशा तक्रारी येत असून फेरीबोट का बंद ठेवली जाते. याची चौकशी करून फेरीबोट सेवा नियमित चालू ठेवली जाईल.
बाजार प्रकल्प, नवीन पोलीस स्थानक उभारणार!
जुने गोवे येथे बाजार प्रकल्प व नवीन पोलीस स्टेशन इमारत बांधण्यात येणार असून येत्या 15 ऑगस्टला त्याची पायाभरणी करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. करमळी तळय़ाचे सौंदर्यीकरणाचे काम चालू झाले असून लवकरात लवकर ते पूर्ण करण्यात येईल. पाणी तंबून गैरसोय होऊ नये म्हणून पाण्याचा निचरा होण्यासाठी मुख्य आहोळाची साफसफाई करण्यात आली आहे.
वांसी बेटावर सुविधा निर्माण करणार!
मतदारसंघातील वांसी बेटावर राहणारे नागरिक बेटावरील गैरसोयीमुळे दुसरीकडे स्थलांतर करू लागले असून त्यांनी परत बेटावर येऊन राहावे, यासाठी वांसी बेटावर चांगल्या सोयीसुविधा निर्माण करण्याचा आपला विचार असून त्यासाठी अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. खोर्ली तिसवाडी औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची चाळण झालेली आहे. याची दखल आपण घेतली असून पावसाळय़ानंतर सगळे अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येईल, असे आमदार फळदेसाई यांनी सांगितले.
मतदारसंघातील दिवाडी बेटावरील नागरिकांना तसेच वांसी बेटावरील नागरिकांना फेरीबोटीतून प्रवास करावा लागतो, त्यासाठी एखाद्या मार्गावर पूल बांधण्याचा आपला विचार आहे का? असा प्रश्न आमदारांना केला असता, तेथील नागरिकांकडून अजूनतरी आपल्याकडे प्रस्ताव आलेला नाही, असे त्यांनी सांगितले. फक्त फेरीबोट सेवा नियमित असावी, अशी तेथील नागरिकांची अपेक्षा असल्याची माहिती त्यांनी दिली.
जुने गोवेचा पर्यटन दृष्टय़ा कायापालट करणार!
जुने गोवे चर्च परिसरात मुख्य रस्त्यांवर पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या जाणीव आपल्याला असून तेथे कायम वाहतूक पोलीस तैनात करण्याचे आदेश आपण संबंधित अधिकाऱयांना दिल्याचे त्यांनी सांगितले. जुने गोवे हे एक जागतिक पर्यटन स्थळ असल्याने येत्या दोन वर्षांत म्हणजेच 2024 डिसेंबरपर्यंत सुमारे 50 कोटी रुपये खर्च करून मूळ ढाच्याला कोणतीही बधा न पोचविता जुने गोवे परिसराचा कायापालट करण्यात येईल. ज्या योगे पर्यटन स्थळाबरोबरच एक उत्कृष्ट पिकनिक स्पॉट म्हणून जुने गोवे परिसर गणला जाईल, असेही आमदारांनी सांगितले.
कुभांरजुवे येथे युवकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करणार!
कुंभारजुवे येथे कायमस्वरुपी डॉक्टर नेमण्यासाठी आपण प्रयत्न चालविले असून लवकरच त्याची पूर्तता होईल, असे ते म्हणाले. मतदारसंघातील युवकांना सर्व सुविधांयुक्त असे क्रीडांगण, त्यांच्या शिक्षणाची सोय, आरोग्य, नोकरी व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करून येत्या पाच वर्षांत कुभांरजुवे एक आदर्श मतदरासंघ म्हणून ओळखला जाईल, अशी मला आशा आहे, असे आमदार फळदेसाई यांनी सांगितले.