नवी दिल्ली : भारतीय वायुदलाच्या एका सैनिकाला संरक्षण संसथा आणि कर्मचाऱयांसंबंधीची गोपनीय आणि संवेदनशील माहिती एका पाकिस्तानी हस्तकाला पुरविल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हा वायुसैनिकावर हनीट्रपमध्ये सापडला होता अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली आहे.
32 वर्षीय देवेंद्र नारायण शर्मा असे आरोपीचे नाव असून तो वायुदलाच्या रिकॉर्ड कार्यालयात प्रशासकीय सहाय्यक म्हणून कार्यरत होता. शर्माला पाकिस्तानच्या एका महिलेने कथितरित्या स्वतःच्या ‘मोहपाशा’त अडकविले होते. शमांने या महिलेला वायुदलाचे कर्मचारी, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील दस्तऐवज पुरविले होते असे चौकशीत आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शर्माला ही माहिती पुरविल्याप्रकरणी पैसेही मिळाले होते. वायुदलाकडून करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारावर त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.