नवी दिल्ली
एअर इंडिया या वर्षी डिसेंबरपासून आपल्या ताफ्यात पाच वाइड-बॉडी बोईंग विमानांसह 30 नवीन विमाने समाविष्ट करणार असल्याची माहिती कंपनीने सोमवारी दिली आहे. टाटाच्या मालकीची विमान कंपनी आपल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सेवांचा विस्तार करण्याच्या विचारात असून विस्ताराचा हा पहिला टप्पा म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे संकेत आहेत.
एअरलाइनने पुढील 15 महिन्यांत पाच वाइड-बॉडी बोईंग विमाने आणि 25 नॅरो-बॉडी एअरबस विमाने घेण्यासाठी याच्याशी संबंधीत पत्रांवर स्वाक्षरी केली आहे. यावेळी एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, या नवीन विमानांमुळे एअरलाइनच्या ताफ्यात 25 टक्क्यांहून अधिक वाढ होईल. ही विमाने 2022 च्या अखेरीस वाहतूक सुरु करतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.