Karnataka Border Dispute : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली बेळगावात आज महामेळावा घेण्यात येणार होता. मात्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला कर्नाटक सरकाने आज सकाळी अचानक बंदी घालत पोलिसी बळाचा वापर करत मेळावा बंद पाडला . या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव सरकारे येण्यास बंदी घातली. यावरून मविआचे नेते आक्रमक झाले आहेत. आज विधानसभेत विरोधीपक्षनेते अजित पावर (Ajit Pawar) यांनी कर्नाटकाचे जिल्हाधिकारी बंदी कशी घालू शकतात असा प्रश्न सरकारला विचारला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादा विषयी चर्चा झाली असताना कर्नाटकचे जिल्हाधिकारी मविआ नेत्यांना कर्नाटकात येण्यास बंदी कशी घालू शकतात असा प्रश्न सरकारला बेळगाव सीमावादावर अजित पवारांनी विचारला.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी विनंती आज त्यांनी विधानसभेत केली.
यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्र्यांचा सीमावादात हस्तक्षेप झाला आहे.आमच्या प्रयत्नानंतर अमित शाहांकडून दखल घेण्यात आली आहे.अमित शाहांनी कर्नाटकला सूचना दिली आहे.सीमावादात राजकारण करता कामा नये. आपण त्यांच्या पाठीशी उभे राहूया असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार मराठी बांधवांच्या पाठिशी ठाम उभे आहे. आजच्या आंदोलनात जर कोणाला अटक झाली असेल तर त्याला सोडवण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
Previous Articleकोगनोळी टोल नाक्यावर महाराष्ट्रातील नेते पोलीसांच्या ताब्यात
Related Posts
Add A Comment