कोल्हापूर : महाराष्ट्रातील गडांचे पावित्र्य जपावे यासाठी शिवभक्त वारंवार आवाहन करत असतात. तर काही लोक गडांवर जाऊन पावित्र्य भंग करत आहेत. असाच प्रकार आज पन्हाळ गडावर घडलाय. गडावरील झुणका भाकर केंद्रांमध्ये काही पर्यटक दारू आढळून आले. या सर्व प्रकाराला विरोध करत शिवभक्त आक्रमक होत. या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पन्हाळगडावर पर्यटकांची ओली पार्टी समोर आल्यानंतर राज्यभरातील शिवभक्त चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज या दारुड्यांविरोधात एल्गार करताना पन्हाळगडावर एकवटले. गडावरील झुणका भाकर केंद्रांमध्ये काही पर्यटकांनी दारू ढोसल्याचे समोर आल्यानंतर शिवभक्तांच्या संतापाचा कडेलोट झाला. राज्यभरातील शिवभक्तांनी एकत्र येत या सर्व प्रकाराला विरोध करताना तीव्र निषेध व्यक्त केलाच राज्यात होत असलेल्या किल्ल्यांच्या पडझडीवरून झोपी गेलेल्या पुरातत्व विभागाला जागे करण्याचा प्रयत्न केला.
सोशल मीडियावर या मद्य पार्टी करणाऱ्यांचे व्हिडीओही व्हायरल झाले होते. दरम्यान, यामुळे आता राज्यभरातील शिवभक्त चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी पन्हाळा प्रशासन आणि पुरात्तव विभागाला एक निवेदन दिले आहे. या निवेदनात काही मागण्या करण्यात आल्या आहेत. गडाच्या संवर्धन जबाबदारीचे पालन आणि गडकिल्ल्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यासंदर्भात हे निवेदन देण्यात आले आहे. यात काही मागण्यांचाही उल्लेख केला आहे.
Previous Articleरोहित पवार म्हणाले, २०२४ नंतर सर्व निर्णय नवीन पिढी घेईल,पण…
Related Posts
Add A Comment