तरुणभारत ऑनलाइन टीम
फळांचा राजा आंब्याचा सीझन सुरु झाला आहे. आणि या जगात आंबा न आवडणारी व्यक्ती क्वचितच सापडेल.बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि त्याचा मुलगा आझादही आंब्याचा आस्वाद घेताना दिसत आहेत.सोशल मीडियावर आमिरने आंबे खात असलेले फोटो शेअर केले आहेत. आमिर खान प्रॉडक्शनच्या इंस्टाग्राम हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत ज्यात आमिर आणि आझाद गप्पा मारताना आणि फळांच्या राजाचा आस्वाद घेताना दिसत होते. पिता पुत्रासमोर एक आंब्यांनी भरलेले ताट दिसत आहे. पहिल्या फोटोत आमिर आंबे कापत आहे. तर ते दुसऱ्या फोटोत स्वादिष्ट आंब्यासोबत उन्हाळ्याच्या आनंददायी दुपारचा आनंद घेत आहेत