वार्ताहर,मुरगूड
Women Wrestling : रोहतक येथे झालेल्या राष्ट्रीय फेडरेशन कप कुस्ती स्पर्धेत येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुल मुरगुडच्या अमृता पुजारीने 65 किलो वजन गटात महाराष्ट्राच्या महिला कुस्ती संघाला एकमेव सुवर्णपदक मिळवून दिले.
पहिल्या फेरीत अमृताला बाय मिळाला. क्वार्टर फायनलमध्ये अमृताने गुजरातच्या गोपीबेन हिला 10- 0 अशा तांत्रिक गुणाधिक्याने पराभूत करून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये अमृताने दिल्लीच्या शिखाला एकेरी पट भारंदाज हे डाव अमलात आणून 10-02 च्या गुणफरकाने पराभूत केले. अंतिम फेरीत अमृताने हरियाणाच्या आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या तनुला 08-06 असे नमवतकारकिर्दीतील पहिले सुवर्णपदक पटकावले.
यानंतर 50 किलो गटात नेहा चौगुलेने रौप्यपदक प्राप्त केले.
नेहाने रिया ढेंगेला पहिल्याच फेरीत रियाला साईड पट काढून झोळी या डावावरती चितपट केले. क्वार्टर फायनल फेरीत उत्तराखंडच्या हेमलता हिला दुहेरी पट भारंदाज या डावावर 10-0 गुण फरकाने पराभूत करून सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. सेमि फायनलमध्ये दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू नेहा शर्मा बरोबरच्या प्रेक्षणीय व तुल्यबळ लढतीत एकेरी पट काढून 4-2 गुण फरकाने नेहास पराभूत करून फायनल गाटली. अंतिम फेरीत हरियाणाच्या आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या हनी कुमारीविरुद्ध नेहाला 08-02 अशा फरकाने पराभवास सामोरे जावे लागले.
तसेच आखाडयाच्या सायली दंडवतेने 76 किलो वजन गटात कास्यपदकाची कमाई केली. तिने कास्यपदकासाठीच्या लढतीत गुजरातच्या सुजाता देवीला 08-04 गुण फरकाने लढत जिंकून कास्यपदक मिळवले. या कामगिरीमुळे तिघींनाही भारतीय संघाच्या शिबिरामध्ये स्थान मिळाले आहे.
हेही वाचा- चैतन्य तारे, आयुष पाटीलची अंतिम फेरीत उडी
या तिघींना आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच दादासो लवटे, वस्ताद सुखदेव येरुडकर, दयानंद खतकर सागर देसाई यांचे मार्गदर्शन तर खासदार संजयदादा मंडलिक, विरेंद्र मंडलिक, साईचे राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण, कार्यवाह आण्णासो थोरवत, डॉ. प्रशांत आथणी, जय शिवराय एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर जिल्हा तालीम संघ यांचे प्रोत्साहन मिळाले.मंडलिक आखाडय़ातील तिन्ही महिला मल्लांनी सुवर्ण, रौप्य व कास्य या तीन पदके मिळवल्यामुळे महाराष्ट्राच्या संघाला महिला कुस्तीमधील सांघिक उपविजेतेपद प्राप्त झाले.
Previous Articleपीककर्ज वसुलीत कोल्हापूर लयभारी
Next Article सोने-चांदीच्या अलंकारांनी सजणार गणराया
Related Posts
Add A Comment