‘पाणी बंद’ चा इशाराः एका सेविकेची प्रकृती खालावली
प्रतिनिधी /पणजी
सेवेतून कमी केल्याचा आदेश रद्द करण्यासाठी कोणतेही प्रतिज्ञापत्र देण्यास उपोषणकर्त्या अंगणवाडी सेविकांनी नकार दर्शविला असून बिनशर्त सदर आदेश मागे घेण्याची मागणी केली आहे. पुन्हा सेवेत घेण्यासाठी गेल्या 40 दिवसांपासून पणजी आझाद मैदानावर 7 अंगणवाडी सेविकांचे उपोषण चालू आहे.
या कर्मचाऱयांना सेवेत घेण्यासाठी विनाकारण सतावण्यात येत असून गरज नसताना त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्राची मागणी केली जात आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांच्या सरकारी धोरणांचा त्या सेविकांनी निषेध केला असून आता आंदोलन अधिक तीव्र करणार असून पाणीही न पिण्याचा इशारा उपोषणकर्त्या अंगणवाडी सेविकांनी दिला आहे.
महिला व बाल विकास खात्यातफ्xढ सदर सेविकांना नोटीशी जारी करण्यात आल्या असून प्रतिज्ञापत्र देण्यास त्यांना बजावण्यात आले आहे. आंदोलन, संपात पुन्हा भाग घेणार नाही, मुख्यमंत्री निवासाबाहेर केलेल्या निदर्शने प्रकरणी माफ्ढाr मागावी असे प्रतिज्ञापत्रातून नमूद करावे असे त्यांना नोटीशीतून कळवण्यात आले आहे. सेवेतून कमी केल्याचा आदेश रद्द केल्यावर आणि सेवेत घेतल्याच्या आदेशाला आव्हान देणार नसल्याची अट त्यांच्यासाठी नोटीशीतून घालण्यात आली आहे. त्या नोटीसा त्यांनी फ्sढटाळून लावल्या असून त्याप्रमाणे कोणतेही प्रतिज्ञापत्र देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
देवयानी तामसे या सेविकेची प्रकृती खालावली असून आझाद मैदानावर डॉक्टरांना पाचारण करण्यात आले होते. सरकारने त्वरित फ्sढरनियुक्ती आदेश काढला नाही तर ‘पाणी बंद’ चा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच सरकारतफ्xढ आणण्यात आलेल्या हमीपत्रावर सही करून ते स्वीकारण्यासही सेविकांनी नकार दिला आहे. सरकारची शंभरी पूर्ण झाली असून त्या सेविकांची उपोषणची चाळीशी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली.