बेळगाव – लंपी स्किन रोगाने गाईंचा मृत्यू होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून गेल्या पाच महिन्यांपासून जनावरांचा आठवडी बाजार बंद ठेवला आहे. मात्र आता पशुपालकांची गैरसोय लक्षात घेऊन अन्य जनावरांच्या विक्रीसाठी हा आठवड्याचा बाजार सुरू करावा अशी मागणी बेळगाव जिल्हा कृषी आधारित पशुविक्रेते कल्याण विकास संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. बेळगाव जिल्हा कृषी आधारित पशुविक्रीचे कल्याण संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी अशा मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.आता लंपी स्किन आजाराचा संसर्ग कमी झाला असल्यामुळे हा जनावरांचा बाजार सुरू करण्याची परवानगी द्यावी असे निवेदनात म्हणण्यात आले आहे. यावेळी चंद्राप्पा पवार, कल्लप्पा पाटील ,संतोष तेली, सिद्धप्पा धामणे इत्यादी उपस्थित होते.
Related Posts
Add A Comment