वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऍपल कंपनीने भारतात तयार केलेल्या 12 लाखाहून अधिक आयफोन्सची शिपमेंट केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दुसऱया तिमाहीमध्ये सदरचे आयफोन्स कंपनीने पाठवले असल्याचे समजते.
साधारण 94 टक्के इतकी वाढ या आयफोन निर्मितीमध्ये दिसली आहे. सायबर मीडिया रिसर्च या फर्मने ही माहिती दिली आहे. आयफोन 12 आणि आयफोन 13 या स्मार्टफोन्सनी अधिक लोकप्रियता मिळवली असल्याचे दिसले आहे. मेक इन इंडिया अंतर्गत ऍपलने सदरच्या फोन्सची निर्मिती भारतामध्येच केली आहे, हे विशेष. भारतीयांनीही आयफोन्सना बऱयापैकी मागणी नोंदवली असल्याचे फर्मने म्हटले असून आगामी काळ हा महत्त्वाचा ठरणार आहे.
आयपॅडचा वाटा
यादरम्यान ऍपलच्या आयपॅडने जवळपास 34 टक्के इतकी मागणीत वाढ नोंदवली आहे. यामध्ये ऍपल आयपॅड जन. 9 व आयपॅड एअर 2022 यांचा यामध्ये सिंहाचा वाटा राहिला आहे.
स्मार्टफोन विक्री थंडावली
स्मार्टफोनच्या बाबतीमध्ये मात्र सध्याला मागणी काहीशी कमी राहिली आहे. महागाईचा दबाव, रुपयाची घसरण या सगळय़ा पार्श्वभूमीवर स्मार्ट फोन्सची विक्री म्हणावी तशी झालेली नाही.