आविष्कार आयोजित लोकमान्य सोसायटी सभागृहात कार्यक्रम
प्रतिनिधी / बेळगाव
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही प्रणाली काळाची गरज आहे. परंतु ते दुधारी शस्त्र असल्याने त्याचा वापर जबाबदारीने करायला हवा, असे मत दत्तांश एज्युटेकच्या चेतना सारंग यांनी व्यक्त केले.

भाग्यनगरमधील लोकमान्य सोसायटीच्या सभागृहात आविष्कार आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. लघुउद्योगांपासून ते अगदी मोठय़ा उद्योगांपर्यंत या कल्पनेचा वापर कसा करता येईल, तसेच ऑनलाईन शॉपिंगमध्ये याचा वापर कशा तऱहेने होतो? हे त्यांनी समजावून सांगितले. यानंतर शांता सामंत यांनी पेपरच्या साहाय्याने विविध पिशव्या कशा तयार करायच्या? याचे प्रात्यक्षिक दाखविले. कागदी पिशव्या वापरणे ही आजची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षा सुलभा खानोलकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. रसिका कडोलकर यांनी सूत्रसंचालन केले.