चेन्नई
एएसजी आय हॉस्पिटल्स नेटवर्क्स यांनी तामिळनाडूतील मूळच्या वासन आय केअर हॉस्पिटलचा ताबा घेतला आहे. मालकी हक्क हस्तांतरण प्रक्रियेच्या माध्यमातून हा व्यवहार झाला असून सदरच्या अधिग्रहणासाठी एएसजी आयने 526 कोटी ऊपये मोजले असल्याचे सांगितले जात आहे. असं जरी असलं तरी वासन आय केअर स्वतंत्र ब्रँड म्हणून यापुढेही कार्यरत राहणार असल्याचे एएसजी आय हॉस्पिटलने स्पष्ट केले आहे.